Police Bharti 2021 महाराष्ट्र पोलीस भरती

महाराष्ट्र पोलीस दलात लवकरच कॉन्स्टेबल पदाची भरती करण्यात येणार असून १६ सप्टेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने एकूण १२५२८ पदे भरण्यासाठी मान्यता दिलेली आहे.
कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणारे उमेदवार इयत्ता १२ वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच त्यांचे वय १८ ते २८ वर्षादरम्यान असावे. हि वयोमर्यादा राखीव प्रवर्गासाठी शिथिलक्षम राहील. पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची तारीख अजून निश्चित नसली तरी इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी करणे आवश्यक आहे.
भरतीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची व्यवस्था केल्यास उमेदवारांना वेळेवर धावपळ करावी लागणार नाही. भरतीची अधिसूचना प्रसिद्ध होताच नोकरी मार्गदर्शन च्या संकेतस्थळावर त्याची सविस्तर माहिती दिल्या जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी अमूल्य आहे. आपल्या सूचनांचे स्वागत आहे.
Your feedback is invaluable to us. Your suggestions are welcome.